आरेाग्य विभागातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरेाप निवेदनात करण्यात आला आहे. सन २०१३ कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असताना २०१८ मधील कर्मचाऱ्यांचा मात्र पदोन्नतीसाठी समावेश करण्यात आल्याचे दिसत आहे. सहायक अधीक्षक संवर्गातून अधीक्षक संवर्गात पदोन्नतीसाठी ९ पदे उपलब्ध होतात तसेच २०२१ च्या सहायक अधीक्षक संवर्गाच्या ज्येष्ठता सुचीमध्ये एकूण २० पदे रिक्त आहेत. दि. १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१च्या कालावधीत एकूण आठ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने पदेान्नतीसाठी कमीत कमी ३७ पदे उपलब्ध होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या जागांवर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नसल्याची माहिती समोर आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
२००४ च्या ज्येष्ठता सूचीनुसार १३ कर्मचाऱ्यांसाठी सहायक अधीक्षक संवर्गात पदोन्नतीसाठी पदे उपलब्ध राहतात, असे असतानाही मागासर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
(फोटो)
130721\355713nsk_36_13072021_13.jpg
आरेाग्य उपसंचालकांना निवेदन देतांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी