शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

एचआयव्हीग्रस्त महिलांची हेळसांड

By admin | Published: January 25, 2015 12:04 AM

जिल्हा रुग्णालयाची अनास्था : वर्षभरात सोळाशेपैकी केवळ ३९ महिलांची तपासणी

नाशिक : एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे जीवनमान सुधारावे, आयुमर्यादा वाढावी यासाठी शासनस्तरावरून चांगले प्रयत्न होत असताना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य सुविधा देणाऱ्या जिल्हा रुग्णालयाकडून मात्र हेळसांड केली जात असल्याचे चित्र आहे़ संसर्गित महिलांची वर्षातून एकदा पॅप स्मेअरची (गर्भाशय) तपासणी करावी, असे शासनाचे आदेश असताना जिल्हा रुग्णालयाकडून तपासणीबाबत टाळाटाळ केली जात आहे़ रुग्णालयाकडून झेड किट, डॉक्टर, लाईट उपलब्ध नसल्याची कारणे सांगितली जात असून, वर्षभरात सोळाशेपैकी केवळ ३९ महिलांचीच तपासणी झाल्याचे माहिती विहार काळजी व आधार केंद्रातर्फे देण्यात आली आहे़नाशिक जिल्ह्यात चौदा हजार एचआयव्ही संसर्गित रुग्ण आहेत़ देशभरातील रुग्णांसाठी केंद्र सरकारने १ जून २०१३ पासून ‘विहान’ कार्यक्रमाची आखणी केली़ आजमितीस देशभरात ६८९ युनिट कार्यरत असून, महाराष्ट्रात ४२ युनिट आहेत़ त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील विहान काळजी व आधार केंद्रात तीन हजार सहाशे एचआयव्ही संसर्गित रुग्णांची नोंद असून, यामध्ये सोळाशे महिला आहेत़ गर्भाशयाचा कॅन्सर तसेच टीबी या कारणांमुळे महिलांच्या मृत्यू अधिक होत असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी संसर्गित महिलांच्या गर्भाशयाची तपासणी करण्याचे आदेश दिले़ मात्र ही तपासणी करण्यास जिल्हा रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार महिलांकडून केली जाते आहे़जिल्हा रुग्णालयात पहिल्या व तिसऱ्या शनिवारी या एचआयव्ही संसर्गित महिलांची तपासणी केली जाते़ यासाठी एकावेळी केवळ पाच म्हणजेच महिन्यात दहाच महिलांची तपासणी केली जाते़ त्यातही तपासणीसाठी आवश्यक असलेले झेड किट नाही, डॉक्टर बाहेरगावी गेले आहेत, लाईट गेलेली आहे अशी कारणे सांगून टाळाटाळ केली जाते़ विशेष म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयात सोळाशे महिलांपैकी केवळ ३९ महिलांचीच वर्षभरात तपासणी करण्यात आली आहे़ त्यामुळे उर्वरित महिलांची कधी तपासणी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे़ या रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळतो मात्र जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ११७ प्रकरणे प्रलंबित आहेत़जिल्हा एड्स नियंत्रण व काळजी समितीची बैठक २७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात होत असून, एचआयव्ही संसर्गित महिला व पुरुषांचे विविध आरोग्य व अडचणींबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी विहान काळजी व आधार केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)