नाशिक : शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांच्या रेकी प्रकरणातील आरोपींच्या न्यायालयीन कामकाजावेळी हजर राहण्याच्या अर्जावर येत्या शुक्रवारी (दि़ १०) सुनावणी होणार आहे़ विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के .के .तंत्रपाळे रजेवर असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़ आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद जबीउद्दीन ऊर्फ अबू जुंदालच्या जिवाला धोका असल्याने त्यास खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जात नाही़ या रेकी प्रकरणातील उर्वरित दोघे आरोपी हिमायत बेग व शेख लालबाबा ऊर्फ बिलाल या तिघांनीही खटल्याच्या वेळी हजर ठेवावे असा अर्ज न्यायालयाला दिला आहे, तर जुंदालच्या वकिलांनी जामीन अर्जही दाखल केला आहे़ जुंदाल, बेग व बिलाल यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर ७ आॅक्टोबरला सुनावणी होणार होती; मात्र विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के .के .तंत्रपाळे रजेवर असल्याने हा निर्णय आता १० आॅक्टोबरला होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय दहशतवादी जुंदालच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी
By admin | Published: October 08, 2014 12:52 AM