शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

नामपूर ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 6:44 PM

नामपूर : करोडो रु पये खर्च करून बांधलेल्या येथील ग्रामीण रु ग्णालयात एकही वैद्यकिय अधिकारी नसल्यामूळे रूग्णांची गैरसोय होत आहे. दि. १७ मे पर्यत मंजूर असलेले चार वैद्यकिय अधिकारी अद्याप मिळालेले नसून या रुग्णालयाला कोणीच वाली नसल्याच्या भावना रुग्णांकडून व्यक्त होत आहेत.

नामपूर येथील ग्रामीण रूग्णालय हे सोळा गाव काटवन मधील रु ग्णांना आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती ठिकाण असून या रु ग्णालयात रोज दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच गंभीर रु ग्णांना औषधोपचार मिळत नसल्यामुळे अशा रुग्णांना संकटांचा सामना करावा लागत आहे. नामपूरच्या ग्रामिण रु ग्णालयात एकूण २५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त १४ पदे भरलेली असून १४ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिक्षक वर्ग एकचे हे महत्वपूर्ण पद रिक्त असून वैद्यकीय अधिकारी ही तीन पदे मंजूर असून तेही पदे रिक्त आहेत. लाखो रु पये किंमतीचे क्ष किरण मशीन अनेक वर्षापासून उपलब्ध आहे मात्र तंत्रज्ञ हे पद रिक्त असल्याने सदर महागडे मशीन अक्षरश: धूळ खात पडून आहे. त्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही रु ग्णांना मालेगावी जावे लागत आहे.फेब्रुवारी महिन्यात १०८ नंबरची रु ग्णवाहिका नाशिकला जात असतांना शॉर्टसर्किटमुळे पुर्णत: जळाली. त्यानंतर रूग्णालयाला नविन रुग्णवाहिका अद्याप मिळालेली नाही. येथील रु ग्ण समितीचे पदाधिकारी प्रा. गुलाबराव कापडणीस यांनी वारंवार रिक्त पदे भरण्याची मागणी केली मात्र अद्याप कार्यवाही होत नसल्यामूळे शुक्रवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सहाय्यक अधिक्षक, कनिष्ठ लिपीक, सफाईदार , शिपाई, कक्ष सेवक, क्ष किरण तंत्रज्ञ ही पदेही रिक्त आहेत. ग्रामीण रु ग्णालयात सचिन कंकरेज, विनोद सावंत, गुलाबराव कापडणीस, नकुल सावंत, रवि देसले, प्रविण सावंत, समिर सावंत, किरण अहिरे, अशोक पवार, नारायण सावंत, आदिंनी दादा भुसे यांच्याशी संपर्कसाधून ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती दिली. १५ तारखेपर्यत तीन वैद्यकीय अधिकारी नामपूरला देण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करेल असे आश्वासन भुसे यांनी दिले.

 

टॅग्स :Healthआरोग्य