नाशिक : शहरातील ७१ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा मिळाला नसून आता पुढील सुनावणी ३० आॅगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने २००९ नंतर शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासाठी आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर शहरातील रस्त्यावरील व खुल्या जागेतील ७१ अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासन कारवाई सुरू करणार असल्याने मंदिर मठ समिती तसेच सर्वधर्मीय धार्मिक नेते एकत्र आले होते. महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी संबंधितांनी चर्चा करून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासंदर्भात सोमवारी (दि.२७) सुनावणी टळली, तर मंगळवारी (दि.२८) झालेल्या सुनावणीच्या वेळी पुढील तारीख ३० आॅगस्ट देण्यात आली आहे.
धार्मिक स्थळांच्या याचिकेवर ३० तारखेस सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:38 AM