लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : अवैधरीत्या दारू तयार कारणाऱ्यांविरुद्ध देवळा पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम सुरू केली असून, वाजगाव येथे कारवाईत एक जणावर गुन्हा दाखल केला आहे. दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले असून, यावेळी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे गावातील नागरिकांनी स्वागत केले आहे.रविवारी (दि. ५) मिळालेल्या माहितीनुसार देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील पवार, नितीन साळवे आदींनी वाजगाव येथील कोलते शिवार वरामेश्वर धरण परिसरात गावठी दारू भट्ट्यांवर छापा मारून जमिनीत बुजून ठेवलेले प्लॅस्टिक ड्रम व दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, साहित्य आदी नष्ट केले.यावेळी १६ लिटर दारू जप्त करण्यात येऊन दादा धाकू सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच बापू देवरे, माजीउपसरपंच अमोल देवरे, विनोद देवरे, ग्रामसेवक जे. व्ही. देवरे आणि पोलीसपाटील निशा देवरे आदी उपस्थित होते.जमावबंदी आदेशाचा भंगलॉकडाउनमुळे तालुक्यातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत. यामुळे गावठी दारूला मागणी वाढली आहे. वाजगाव येथे काही ठिकाणी देशी व गावठी दारूची विक्र ी केली जात असल्यामुळे शेजारील गावातील असंख्य मद्यपी त्या ठिकाणांवर गर्दी करू लागल्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग व या गर्दीमुळे कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता विचारात घेऊन वाजगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पोलीसपाटील यांनी आदिवासी वस्तीत जाऊन या विक्रेत्यांना दोन दिवसांपूर्वी दारूविक्र ी बंद करण्याची ताकीद दिली होती.वाजगाव येथे १०० टक्के दारूबंदी करण्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. दारूची भट्टी टाकण्यासाठी शेतात जागा उपलब्ध करून देणाºया शेतकºयांना ताकीद दिली असून, यापुढे अशा शेतकºयांची माहिती पोलिसांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- निशा देवरे,पोलीसपाटील, वाजगाव
गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 10:40 PM
देवळा : अवैधरीत्या दारू तयार कारणाऱ्यांविरुद्ध देवळा पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम सुरू केली असून, वाजगाव येथे कारवाईत एक जणावर गुन्हा दाखल केला आहे. दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले असून, यावेळी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे गावातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
ठळक मुद्देवाजगाव ग्रामस्थांचा पुढाकार : पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा