घोटी/कवडदरा : गावठी दारूमुळे संसार उध्वस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील रणरागिणी आक्र मक झाल्या. बुधवारी संतापलेल्या महिलांनी गावठी दारूचे अड्डे उध्वस्त केले. पोलिसांकडून दारूच्या भट्ट्या वेळोवेळो बंद करूनही चोरी छुप्या मार्गाने मुबलक दारू मिळत असल्याने महिलांनी कडक पवित्रा घेतला.शेवगेडांग हे गाव जंगली आणि डोंगरी भागात वसलेले आहे. या भागात गावठी दारू बनवणारे अनेक अड्डे आहेत. पोलीस प्रशासनाने अनेकदा या अड्ड्यांवर छापे टाकले. मात्र पोलिसांची पाठ फिरताच गावठी दारुच्या अवैध भट्ट्या पुन्हा सुरू होतात. यामुळे अनेक कुटुंबांत व्यसनाधीन युवक आणि कुटुंबप्रमुखांची संख्या वाढली आहे. परिणामी शेवगेडांग येथील महिलांच्या संतापाचा अतिरेक झाला. संतप्त महिलांनी आक्र मक पवित्रा घेऊन संघटितपणे गावातील सुरु असलेलेल्या गावठी दारुच्या धंद्यावर हल्लाबोल केला. महिलांकडून आक्र मकपणे हे दारूधंदे उद्ध्वस्त करण्यात आले. शेकडो लिटर गावठी दारु आणि दारू बनवण्याचे साहित्य महिलांनी ओतून देत नष्ट केली.शेवगेडांग येथे गावठी दारु च्या विक्र ीचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. गावातील तरु ण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाल्याने महिलासह ग्रामस्थही त्रस्त झाले होते. पोलिसांकडून अवैध धंद्यांवर नियंत्रण आल्यानंतर पुन्हा काही दिवसात हे धंदे सक्रि य होत होते. त्यामुळे आपणच हे धंदे उद्ध्वस्त करण्याचा निर्धार महिलांनी केला. यावेळी शेकडो लिटर गावठी दारु या नष्ट करीत साहित्य, गावठी दारु निर्मितीचे साहित्य, विषारी रसायन नष्ट केले.
महिलांकडून गावठी दारूचे अड्डे उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:24 PM