शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

नांदूरशिंगोटे परिसरात आर्द्रा नक्षत्राची मुसळधार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:59 PM

नांदूरशिंगोटे : तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने दुपारी चार वाजेच्या सुमारास ...

ठळक मुद्देबळीराजा सुखावला : तब्बल दीड तास पाऊस, पेरण्यांना मदत

नांदूरशिंगोटे : तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने दुपारी चार वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लांबणीवर पडलेल्या खरीप हंगामातील पेरण्यांना मदत होणार आहे. सुमारे तासभराहून अधिक काळ सुरु असलेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचले होते.नांदूरशिंगोटे येथे व परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा असल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत होता. रविवारी सायंकाळी व सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बळीराजा आतुरतेने पावसाची वाट पाहात होता. सोमवारी दुपारपासूनच आकाशात ढग दाटून आल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मान्सूनपूर्व पावसाच्या पाण्यावर काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकाची पेरणी व लागवड केली होती. तर काही भागात पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. या अगोदर काही प्रमाणात ज्या पेरण्या झाल्या आहेत, त्या पिकांना देखील झालेल्या पावसाने जीवदान मिळाले आहे. अचानक आलेल्या पावसाने सर्वच पाणीच पाणी झाले होते. तर शेतात पाण्याचे तळे तयार झाल्याचे चित्र होते. रस्त्यावरुन तसेच रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहत असल्याने परिसर जलमय झाला होता.--------------------पावसाने परिसराला झोडपलेनांदूरशिंगोटे व परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी तसेच दापूर परिसरातील चापडगाव, दोडी, दापूर, गोंदे, माळवाडी, मानोरी, कणकोरी आदी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिसरात तब्बल दीड तास पाऊस पडला. शेतात सर्वत्र पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दापूर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा आर्द्रा नक्षत्रातही या भागाला झोडपले आहे त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे.--------------फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील दापूर व भोजापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जलमय झालेले शेत. (२८ नांदूरशिंगोटे १/२/३)

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस