इगतपुरी शहरात धुवाधार पावसाने सर्वत्र गारवा पसरला असून कसारा घाट, घाटमाथा, महामार्गावर, शहराला धुक्याने वेढले असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. विकेंड असल्याने भावली धरण परिसर व धबधब्याजवळ पर्यटकांनी असंख्य गर्दी करत निसर्गाचा आनंद घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने याठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. पर्यटकांच्या वाहनामुळे भावली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
इन्फो
लाल मातीमुळे चिखलाचे साम्राज्य
दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्ताने खड्डे डागडुजीसाठी मुरूम ऐवजी लाल माती टाकण्यात आली होती. या लाल मातीमुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून खड्डे कमी होण्याऐवजी आणखी खड्ड्यांची वाढ झाली. या जोरदार पावसाने ही लाल मातीही वाहून गेली असून धो धो पडणाऱ्या पावसामुळे ग्राहकांनी बाजारपेठेत येण्यास टाळल्याने बाजारपेठ मंदावली होती.
110921\1814-img-20210911-wa0009.jpg
१) इगतपुरी शहरात मुसळधार पाऊस पडतांना दिसत आहे