अभोणा : अभोणा शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवार (दि१९)साडेनऊच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.सुमारे दिड ते दोन तास टपोऱ्या थेंबांसह संततधार कायमहोती.त्यामुळे नदी- नाल्यांना पुर आले. सोसाट्याचा वारा,जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाने तालुक्यात काढणीला आलेला मका,बाजरी, भुईमूग,सोयाबीन ही पिके पूर्णत:वाया गेली. काही ठिकाणी कांद्याचे रोप व लागवड केलेल्या लाल कांद्याचे पिक वाया गेले. मुसळधारेने तालुक्यासह कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर, पुनंद(अर्जुनसागर) धरणांमध्ये क्षमतेएवढा पाणी साठा झाला आहे.कालरात्री चणकापूर मधून गिरणा नदीपात्रात ९०८क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला. चणकापूर उजव्या कालव्याद्वारे १२० क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. गिरणापात्रातून २०हजार ९११ क्सुसेक,तर उजव्या कालव्याद्वारे ३०३१ क्सुसेक विसर्ग करण्यात आला आहे. तर पुनद प्रकल्पातून ६८०क्युसेकने विसर्ग सुरू असून आतापर्यंत ३१हजार ७१६ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.त्याच बरोबर तालुक्यातील (कंसात क्षमता दलघफूमध्ये) धनोली (१७३),भेगू (९७),गोबापूर (७९), मळगाव(९९),बोरदैवत (६९),मार्कंडपिंप्री (४०),धार्डेदिगर(३३)खिराड (४०),ओतुर(९७),भांडणे (५३),जामलेवणी (६३) यासह तालुक्यातील सर्व पाझरतलाव १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागले आहेत यंदाच्या दमदार पावसाने गिरणाकाठावरील ५१ तर पुनंद काठावरील ३१ अशा ८२ गावाच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली असून आगामी वर्षाचा पाणीप्रश्न तसेच शेती सिंचनाची समस्या दूर झाली आहे. काल रात्रीत तालुक्यात कळवण येथे सर्वाधिक (७९) त्या खालोखाल नवीबेज(६७),मोकभणगी (६६),अभोणा (५२), कनाशी (५१)व दळवट येथे(३९) मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.