नाशिक : गेल्या आठवड्यापासून तुरळक सुरू असलेल्या पावसाने सोमवारी (दि.१) जिल्ह्णातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. गंगापूर धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला असून, त्र्यंबकेश्वर, पेठ, नांदगाव, बागलाणमध्येदेखील दमदार पाऊस झाला. इगतपुरीत आजही पावसाचा जोर कायम राहिला.जिल्ह्णात सुमारे तीन ते चार तास सर्वदूर पावसाच्या सरी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषत: धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत काहीशी वाढही झाली आहे. गंगापूर, कश्यपी, त्र्यंबक आणि अंबोली क्षेत्रात चांगला पाऊस बरसला. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर काही भागांत मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसलाच नाही. नाशिक शहरातही जोरदार पाऊस कोसळल्याने संपूर्ण शहरातील रस्ते जलमय झाले होते. मंगळवारी मध्यम स्वरूपाचा अंदाजहवामान खात्याने गेल्या दोन दिवसांचा अंदाज वर्तविला असून उत्तर महाराष्टÑात मध्यमस्वरूपाचा तुरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्णातील काही भागांत हलकासा पाऊस होण्याची शक्यता असून, धुळे, नंदुरबार, आणि जळगावमध्ये ही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. सायंकाळी मात्र पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता आहे.३५ टॅँकर्स बंदनांदगावमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाल्यामुळे सोमवार, दि. १ जुलैपासून येथे सुरू असलेल्या टॅँकर्सच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. सुरू असलेल्या टॅँकर्स पैकी ३५ टॅँकर्स बंद करण्यात आले आहेत. नऊ गावे आणि १३१ वाड्या-वस्त्यांना ३५ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. परंतु पाऊस समाधानकारक झाल्यामुळे येथील टॅँकर्स बंद करण्यात आले आहेत. मात्र तालुक्यात अजूनही ४९ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. २५ गावे आणि १९६ वाड्यापाड्यांना या टॅँकर्सच्या माध्यमातून अजूनही पाणीपुरवठा सुरूच ठेवावा लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:31 AM