शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:42 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मृग नक्षत्र सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मृग नक्षत्र सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने भाजीपाला विक्रीसाठी आलेले व्यापारी, शेतकरी व ग्राहक यांची चांगलीच धावपळ उडाली होती. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने डोंगराच्या काही भागात व शेतात पावसाचेपाणी साचले होते. पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात असल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत होते.दिंडोरी : शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भाजीपाला बाजारात व्यापारी व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.-----------------------------------सिन्नर शहरासह तालुक्यात मान्सून पावसाचे आगमनसिन्नर : शहरासह तालुक्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. मान्सून पावसाचे तालुक्यात आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्यात फारसी टंचाई जाणवली नाही. यावर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गुरुवारी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली.वावी, पांगरी, मिठसागरे, शहा, कहांडळवाडी या गावांमध्ये पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी सिन्नर शहरासह मुसळगाव, ठाणगाव या गावांसह पश्चिम पट्ट्यात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत जाणवत होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. शेतकºयांनी खरीपपूर्व मशागतीची तयारी केली असून आता शेतकºयांना खरीप पेरणीचे वेध लागले आहे.-----------------वणी : शहर व परिसरात दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सुमारे एक तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी, मुळाणे, चंडीकापूर मांदाणे, तळेगाव, औताळे, कृष्णागाव, मावडी, सोनजांब, खेडगाव, कोशिंबे, पुणेगाव, पांडाणे, अंबानेर, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, माळे दुमाला, काजी माळे, पिंपरखेड, परिसरात सायंकाळी झालेला पाऊस शेती मशागतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. या पावसाची गरजच होती, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक