देशमाने : येवला तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीसह खरीप पिकांची धूळधाण झाली असून, देशमाने येथील गोई नदीला आलेल्या पुरामुळे नदीचा भूभाग खचला आहे. चुकीच्या बांधकामाचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याची तत्काळ चौकशी करुन संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.गेल्या शुक्र वारी मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आले. अतिपाण्याने गोई नदी पात्र दुथडी भरुन वाहत होते. गावाजवळील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जुन्या पुलावर चिचोंडी येथिल निर्धारित एमआयडीसीसाठी नेण्यात आलेल्या जलवाहिनीसाठी जुन्या पुलावरच समांतर संरक्षक भिंत टाकली आहे. या भिंतीमुळे पुराच्या पाण्याचा प्रवाह बदलून जोरदार वाहणार्या पाण्याने पूर्वेकडील मोठा भूभाग खचला आहे. भूभाग खचल्याने मुखेड येथे जाणारा रस्ता व आगामी काळात गणपती मंदिरास पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. चुकीचे बांधकाम करणारा ठेकेदार व एमआयडीसी अधिकार्यावर कारवाई करावी असी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुसळधार पावसाने गोई नदीचा भूभाग खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 3:17 PM
देशमाने : येवला तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीसह खरीप पिकांची धूळधाण झाली असून, देशमाने येथील गोई नदीला आलेल्या पुरामुळे नदीचा भूभाग खचला आहे. चुकीच्या बांधकामाचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याची तत्काळ चौकशी करुन संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
ठळक मुद्देगेल्या शुक्र वारी मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आले. अतिपाण्याने गोई नदी पात्र दुथडी भरुन वाहत होते. गावाजवळील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जुन्या पुलावर चिचोंडी येथिल निर्धारित एमआयडीसीसाठी नेण्यात आलेल्या जलवाहिनीसाठी जुन्या पुलावरच समांतर संरक्षक भ