जनजीवन विस्कळीत - एकाच दिवसात १५० मिमी कोसळला
पेठ : मागील ४८ तासांपासून पेठ शहरासह तालुक्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, कोसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, जवळपास सर्वच नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. दमणगंगा, नार- पारसह लहान-मोठ्या नद्यांना प्रचंड पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी ( दि.१४) एकाच दिवसात जवळपास १४९.७ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाने थैमान घातले. पावसाबरोबर प्रचंड धुके निर्माण झाल्याने नाशिक-पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. पेठ तालुक्यात बुरुंडी, खडकी,बिलकस, शेपुझरी, या ठिकाणच्या धबधब्यावरून मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी जात असल्याने पर्यटकांनी सध्या तरी नदी किंवा धबधबा परिसरात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
पेठ तालुका पर्जन्यस्थिती
*१३ सप्टेंबर रोजी पडलेला पाऊस -१४९.१ मिमी
* १ ते १४ सप्टेंबरअखेर पडलेला पाऊस -४७६.१ मिमी
* माहे सप्टेंबरची टक्केवारी -१४३ मिमी
* जून ते सप्टेंबरअखेर सरासरी -२०४३.१ मिमी
*प्रत्यक्ष पडलेला पाऊस - २००४.१ मिमी
*टक्केवारी -९८.०९ टक्के
------------------------
बिलकस, ता. पेठ येथील धबधब्याने धारण केलेले रौद्ररूप. (१४ पेठ रेन १/२)
140921\14nsk_15_14092021_13.jpg~140921\14nsk_16_14092021_13.jpg
१४ पेठ रेन १~१४ पेठ रेन २