मालेगाव : शहर परिसरात रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळ पासून उकाड्याने नागरिक हैराण झाले जोते.सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. जाफरनगर नजीक पहिल्याच पावसात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत गेल्याच वर्षी जाफरनगर भागातील नागरिकानी केलेल्या आंदोलनानंतर रस्ता डागडुजी करून दुरुस्त करण्यात आला होता तोच रस्ता पावसात पुन्हा उखडल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पावसामुळे हवेत गारठा पसरला आहे. यंदा पाऊस वेळेवर सुरुभौन समाधानकारक बरसत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे़मात्र माळमाथा भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे झोडगे, कंधाने टोकडे परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून कही शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.काही शेतामध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने पिके सडू लागली आहेत.िसन्नर : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात मान्सूनचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. तालुक्यात ८० टक्के पेरणी उरकली असल्याने बळीराजा पावसाला साकडे घालत असताना गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात पावसाला पुन्हा सुरु वात झाली असून, कमी-अधिक प्रमाणात बरसणाºया पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शनिवारी (दि.२७) सायंकाळी ६ च्या सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला. सुुमारे दोन ते अडीच तास पाऊस सुरू होता. शुक्र वारपर्यंतची (दि.२६) सकाळी ७ वाजेची आकडेवारी बघता गेल्या २४ तासांत पावसाचे माहेरघर असणाºया पांढुर्ली महसूल मंडळात सर्वाधिक ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मालेगाव,सिन्नरला जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:45 PM