ओतुर : कळवण तालुक्यातील ओतूर, कुंडाणे परिसरात गुरुवारी (दि. २२) रात्री ढगफुटीसारखा जोरदार पाऊस झाल्याने मका, कांद्याचे रोपे व रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून चित्रा नक्षत्राच्या पावसाने थैमान घातले असून, उन्हाळ कांद्यांची रोपे पिवळी पडून खराब झाली आहेत. एकतर शेतकऱ्यांनी महागडी कांदा बियाणे पाच हजार रुपये किलोप्रमाणे विकत घेतली आहेत. त्यातच अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे तसेच मका पिकाचेही प्रचंड नुकसान झाले असून, कडबा पूर्ण खराब झाला आहे तसेच मार्कण्डेय नदीवरील ओतूर ते मोरे वस्ती रस्तावरील तात्पुरती बांधिलेली फरशी तसेच कुंडाणे फाटा ते शिवमन पाडा रस्त्यालगत नदीवरील पूल हे दोन्ही पूल वाहून गेल्याने नदी पलीकडील शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. शासनाने सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी व वरील दोन्ही ठिकाणी नदीवरील फरशी पूल बांधण्यात यावेत, अशी जोरदार मागणी ओतूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
ओतूर परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:15 PM
कळवण तालुक्यातील ओतूर, कुंडाणे परिसरात गुरुवारी (दि. २२) रात्री ढगफुटीसारखा जोरदार पाऊस झाल्याने मका, कांद्याचे रोपे व रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून चित्रा नक्षत्राच्या पावसाने थैमान घातले असून, उन्हाळ कांद्यांची रोपे पिवळी पडून खराब झाली आहेत. एकतर शेतकऱ्यांनी महागडी कांदा बियाणे पाच हजार रुपये किलोप्रमाणे विकत घेतली आहेत. त्यातच अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : मका, कांद्याचे रोपे; रस्त्यांचे मोठे नुकसान