सिन्नर : निसर्ग चक्र ीवादळाचा मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने सिन्नर व निफाड तालुक्यात प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सायंकाळी 6वाजेच्या सुमारास शहर आणि ग्रामीण भागात वादळी पावसाला सुरु वात झाली. सायंकाळी 7 पावसाचा जोर वाढला होता.निसर्ग चक्र ीवादळाच्या पार्शवभूमीवर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पाठारे यांनी तालुक्यातील नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.चक्र ीवादळाच्या पाशर््वभूमीवर नगरपंचायत क्षेत्र व ग्रामीण भागातील मेडिकल, रु ग्णालये, पेट्रोल पंप, चारचाकी वाहन दुरु स्ती, पावसाळी साहित्य दुकाने वगळून इतर सर्व दुकाने व पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले होते. गुरु वार दि. ४ परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती गंभीर असल्यास फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे यांनी ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामीण भागात दक्षता घेण्याचे निर्देश दिले होते. सायंकाळी वादळ व पावसाचा जोर होता. नाशिक-पुणे महामार्गावर झाड कोसळल्याचे समजते.
सिन्नर तालुक्यात वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 9:12 PM