शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मुसळधार पावसाने शहराला झोडपले

By admin | Published: January 24, 2015 11:52 PM

मुसळधार पावसाने शहराला झोडपले

नाशिक : गुरुवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे अखेर अपेक्षेप्रमाणे शनिवारी मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. दिवसभर ऊनसावल्यांचा खेळ सुरू असताना सायंकाळच्या सुमारास दाटून आलेल्या काळ्या ढगांनी एकदमच कोसळायला सुरुवात केली. काही आठवड्यांपासून नाशिक हे राज्यातील थंडीचे शहर ठरते आहे. शहरात ६ अंश तपमान असताना ग्रामीण भागातील पारा यापेक्षा घसरला होता. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि उत्तरेतून येणारे गार वारे यामुळे नाशिकमध्ये थंडीची तीव्रता वाढली होती. त्यातच आर्द्रताही घटल्याने पावसानेही हजेरी लावून थंडीत वाढ केली.अशातच जानेवारीच्या मध्यानंतर शहरातील तपमान पुन्हा वाढीस लागले होते. १४ पर्यंत तपमान गेल्यानंतर पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरणाचे सावट होते. गुरुवारपासूनच शहरावर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. शनिवारी सायंकाळी ७च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. पादचारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचे त्यामुळे मोठे हाल झाले. परंतु त्यामुळे शहरातील तपमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, असे झाल्यास पुन्हा शेकोट्या पेटू लागतील. अजून काही दिवस मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरणाचे कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)