मानोरी : येवला तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके तरारली असून, मका, सोयाबीन, मूग आदी पिकांच्या निंदणी, खुरपणीच्या कामांना पावसामुळे वेग आला असून, शेतकरी सुखावला असल्याचे चित्र कोटमगाव परिसरात बघायला मिळाले आहे. मान्सूनपूर्व पावसाने, तसेच मृग, आद्रा नक्षत्रात वरुण राजाने दमदार हजेरी लावल्याने येवला तालुक्यातील पूर्व भागात खरीप हंगामातील मका, सोयाबीन, मूग आदी पिकांच्या पेरण्या वेळेत झाल्या असल्याचे दिसून आले होते.
यंदा वेळेवर झाल्यावर दमदार पावसामुळे येथील परिसरात मका आणि सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे बघायला मिळत आहे. मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मक्यावर लष्करीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे बघायला मिळाले होते. यंदा मात्र मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झालेला असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत असून, लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी असल्याने पिकेदेखील पावसामुळे हिरवीगार झाली आहे. सोयाबीनचे पीकदेखील दर्जेदार असून, सध्या सोयाबीनवरदेखील अळीचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात दिसून येत असल्याने सोयाबीन पिकांवर औषधफवारणी करताना शेतकरी दिसून येत आहे. दमदार पाऊस आणि मका, सोयाबीनचे दर्जेदार झालेल्या पिकांमुळे सध्या कोटमगाव परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------------------
दमदार पावसामुळे कोटमगाव परिसरात यंदा लवकर पेरण्या झाल्या. पेरण्या झाल्यानंतर वेळोवेळी पाऊस पडत राहिल्याने मका आणि सोयाबीनची पिके हिरवीगार झाली असून, यंदा मका आणि सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव अजून कमी प्रमाणात असून, अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषध फवारणी सुरू आहे.’
-जितेंद्र मोरे, शेतकरी, कोटमगाव खुर्द
------------------
फोटो : कोटमगाव खुर्द येथे दमदार पावसामुळे पिके हिरवीगार आणि दर्जेदार उतरली असून, सध्या सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी सुरू असलेली औषध फवारणी. (२० मानोरी)
200721\20nsk_50_20072021_13.jpg
२० मानोरी