शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

अवजड ट्रेलरने वाहतूक पोलिसाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:36 AM

एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असून, ग्रामीण भागात अपघातांची वाढती समस्या पोलीस व आरटीओ प्रशासनाची डोकेदुखी बनत चालली ...

एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असून, ग्रामीण भागात अपघातांची वाढती समस्या पोलीस व आरटीओ प्रशासनाची डोकेदुखी बनत चालली आहे. वांगणी गावाच्या फाट्यावर नाशिक येथून पेठमार्गे बडोद्याकडे राजू रोडलाइन्स ट्रान्सपाेर्ट कंपनीचा ट्रेलर (एमएच २३ एयू १४४१) भरधाव जात होता. जिल्हा वाहतूक शाखेच्या वाहनाजवळ कर्तव्यावर उभे असलेले गायकवाड यांना त्या वाहनावर संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबविण्याचा इशारा केला. मात्र, ट्रकचालक व मालक संशयित राजू विक्रम गर्जे (४२, रा. बीड) याने त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गायकवाड यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ पोलिसांनी संशयित ट्रकचालक राजू गर्जे यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नियमितप्रमाणे फिरते पथक वांगणी नाक्यावर थांबून मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत होते. दुपारी दुर्घटना घडण्यापूर्वी जवळपास १३ वाहनचालकांवर पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. संशयित गर्जे याने ट्रेलरवरील नियंत्रण सोडून देत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देऊन गायकवाड यांना जबर धडक दिली. या धडकेत गायकवाड हे अवजड ट्रेलरच्या चाकाखाली सापडून गंभीररीत्या जखमी झाल्याने जागीच गतप्राण झाले.

दरम्यान, गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पाेलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

--इन्फो--

सिमेंट ‘मिक्सर’ची वाहतूक

अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रेलरवरून नाशिक येथून तीन सिमेंट मिक्सर बडोद्याच्या दिशेने वाहून नेले जात होते. पेठ गावातून ट्रेलर बाहेर पडल्यानंतर गर्जे याचा वाहनावरील वेग नियंत्रणात राहिला नाही. त्याने भरधाव वाहन दामटविल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या तावडीतून निसटण्याच्या प्रयत्नात पोलिसाच्या अंगावर ट्रेलरचे चाक गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गर्जे हा स्वत: ट्रेलरचा मालक व चालक आहे.

कोट--

गायकवाड यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. या घटनेने ग्रामीण पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलाकडून शहीद पोलीस जवान यानुसार तातडीचे अर्थसाहाय्य त्यांच्या कुटुंबीयांना दिले जाणार आहे. शासकीय नियमानुसार अनुकंपा तत्त्वावर कुटुंबापैकी एका वारसदाराला नोकरीत सामावून घेतले जाईल. संपूर्ण ग्रामीण पोलीस दल गायकवाड कुटुंबीयांसोबत आहे.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक

---

फोटो आर वर ३०कुमार नावाने सेव्ह आहे.