कळवण:पुणे येथे दि.२४व२५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लाडशाखीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील समाजबाधवांसाठी हितगुज मेळाव्याचे आयोजन कळवणच्या लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात करण्यात आले होते.राष्ट्रीय महाअधिवेशन कार्यकारीणीतील महाराष्ट्रासह गुजरातमधील बहुतांश मान्यवरांची उपस्थीती या मेळाव्यात होती. सूत्रसंचालन दिपक महाजन यांनी केले, स्वागत अजय मालपुरे यांनी केले. प्रास्ताविक विलास शिरोरे यांनी केले. महाअधिवेशनाचे सचिव राजेश कोठावदे, सचिन बागड, शामकांत शेंडे, सुनिल नेरकर, पुणे जिल्हा समन्वयक विवेक शिरोडे, जळगांव जिल्हा समन्वयक गजानन मालपुरे, नासिक जिल्हा महिला समन्वयक सौ. उषा बागडे, युवा समन्वयक अभय नेरकर यांनी मनोगत व्यक्त करून अधिवेशनाचा उद्देश व नियोजनाबाबत सांगितले.स्वागताध्यक्ष आर एल वाणी यांनी अधिवेशनाच्या कार्याचा आढावा घेतला .अधिवेशनाचे कार्याध्यक्ष व देऊळबंध चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी यांनी हे अधिवेशन युवा उद्योजकांना प्रेरणादायी ठरणार आहे.कळवण समाजाध्यक्ष डॉ पी.एच.कोठावदे यांनी आभार मानले.जिल्ह्यातुन १०हजारांहून अधिक समाजबांधव या अधिवेशनासाठी येतील असा निर्धार सर्वांनी हात उंचावत व्यक्त केला.यावेळी नाशिक जिल्ह्यासह धुळे,जळगाव, नंदुरबार,पुणे,मुंबई,गुजरात येथील समाजबांधव उपस्थित होते.