शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

७०० थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:20 AM

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरुद्ध पुन्हा वसुली मोहीम हाती घेतली असून, जिल्ह्यातील ७०० बड्या कर्जदारांकडे तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे पाहून त्यांनी कर्ज घेतेवेळी तारण ठेवलेल्या स्थावर मालमत्ता जप्त करून नजीकच्या काळात त्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. बॅँकेच्या एकूण कर्जापैकी ७४२.५४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, त्यात १२५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देजिल्हा बॅँक : १२५ वाहने जप्त; जूनअखेर ७४२ कोटी रुपयांची वसुली

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरुद्ध पुन्हा वसुली मोहीम हाती घेतली असून, जिल्ह्यातील ७०० बड्या कर्जदारांकडे तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे पाहून त्यांनी कर्ज घेतेवेळी तारण ठेवलेल्या स्थावर मालमत्ता जप्त करून नजीकच्या काळात त्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. बॅँकेच्या एकूण कर्जापैकी ७४२.५४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, त्यात १२५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.जिल्हा बॅँकेने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात वसुलीचे उद्दिष्ट पाहता बँकेची एकूण वसुलीस पात्र रक्कम २७६९.६१ कोटी असून, मार्च २०१८ अखेर ५३५.६८ मुद्दल १९ टक्के व व्याजाची रु. २६०.६७ कोटी रक्कम वसूल झाली आहे. बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी जिल्ह्यातील बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कर्ज वसुलीचे प्रयत्न केले होते त्यात जंगम जप्तीद्वारे थकबाकी झालेले वाहने म्हणजे ट्रॅक्टर, जीप, मोटरसायकल अशा सुमारे १२५ वाहनांची जप्ती करून लिलावाद्वारे २ कोटी रकमेची वसुली करण्यात आली आहे. जूनअखेर वसुलीस पात्र २७६९.६१ कोटी रकमेपोटी एकूण मुद्दल रु. ६७३.९४ व व्याज रु. २६८.६० कोटी कर्ज वसुली म्हणजे २४.३९ टक्के झाली आहे. जून २०१८ अखेर जास्तीत जास्त कर्ज वसुली होणेसाठी १ जूनपासून परत कर्ज वसुली मोहीम राबवून व जुने तसेच ऐपतदार थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाºयांना प्राप्त १५६ अधिकारान्वये सहकार कायदा १९६० चे कलम १०७ नुसार जप्ती करून लिलावप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश बजावण्यात आले आहेत. उर्वरित थकबाकीदारांवर जप्ती आदेश काढण्यात येणार आहे.एक वेळ समझोता योजनाशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकºयाकडे मुद्दल व व्याजासह दीड लाखावरील थकीत कर्ज आहे व ज्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली आहेत, अशा शेतकºयांनी दीड लाखावरील त्याच्या हिश्शाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर शासनाकडून ‘एक वेळ समझोता योजना’अंतर्गत दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २१७०० खातेदारांपैकी फक्त ११००० खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सदर योजनेची अंतिम मुदत ३० जूनपर्यंतच असल्याने उर्वरित खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.