पंचवटी : गोदावरीला आलेल्या पुरामुळे पंचवटी स्मशानभूमीत राहणाऱ्या सुनीता पाटील यांचे घर कोसळले तसेच संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने पूर्व विधानसभा युवा सेनेच्या वतीने पाटील यांना गृहपयोगी वस्तू व मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. युवासेनेचे शहर समन्वयक निशांत औसरकर, उपमहानगरप्रमुख दिगंबर मोगरे, दीपक दातीर, समर्थ मुठाळ, आकाश काळे यांनी स्मशानभूमीत जाऊन पाटील यांची भेट घेत त्यांना अन्न-धान्य व संसारोपयोगी वस्तू देऊन सांत्वन केले. पाटील या स्मशानभूमीत नि:स्वार्थी भावनेने उत्तरकार्य करतात म्हणून ही मदत करण्यात आली. (वार्ताहर)
स्मशानभूमीत राहणाऱ्या पाटील यांना मदत
By admin | Published: August 07, 2016 10:58 PM