शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दाभाडीसह अकरा गाव योजनेस तळवाडेतून पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:28 AM

दाभाडीसह अकरा गाव योजनेस तळवाडेतून पाणी देणार

लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : पाणीपुरवठा आरक्षणास धक्का न लावता दाभाडीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेस ५० दलघफू पाणी आरक्षण शासनाने मंजूर केल्यास तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास यावे या विषयास मनपाच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर रशीद शेख होते. मनपाच्या कर्मचारी, अधिकारी, कामगार यांना वैद्यकीय भत्ता २०० रूपयांवरुन ५०० देण्यास सभागृहाने मंजुरी दिली. यासह विविध १३ विषयांना मंजुरी देण्यात आली.महाआघाडीचे गटनेते बुलंद एकबाल यांनी द्याने, रमजानपुरा, मालधे सारख्या हद्दवाढ परिसरातील झोपडपट्टीवासियांना पाणी देण्यात यावे. नंतर दाभाडी पाणीपुरवठासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी उपसूचना मांडली. डॉ. खालीद परवेझ यांनी पाणी आरक्षणाला धक्का लागणार नसेल तर देण्यास विरोध नाही; परंतु गतवर्षी जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गिरणा धरणातून शहराचे पाणी आरक्षण कमी करुन जळगावला देण्यात आले होते. याची जाणीव करुन दिली. चर्चेअंती दाभाडीसह पाणी देण्यासाठी मतदान घेण्यात आले. यात २१ विरुद्ध ५१ अशा बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. डॉ. खालीद परवेझ यांनी अटल अमृत योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मूळ नकाशाप्रमाणे कामे न करता त्यात फेरफार केल्याचा आरोप डॉ. खालीद यांनी केला. त्यावर मुख्य अभियंता जहीर अन्सारी यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भाजपाचे मदन गायकवाड यांनी ओपन स्पेसवर पाण्याची टाकी बनवितात तेव्हा नियम कोठे जातात, असा प्रश्न केला.त्यावर जहीर असा प्रश्न केला. त्यावर जहीर अन्सारी यांनी उच्च आवाजात उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर महापौर शेख रशीद यांनी नगरसेवकांना दादागिरीने उत्तर देणार का? असे विचारत अन्सारी यांना शिस्तीत राहण्याचे आदेश दिले. तुमच्यामुळे शहराच्या गोरगरीबांना नळाचे पाणी मिळत नसल्याचा आरोप खुद्द महापौरांनी केला. तब्बल चार तास चाललेल्या आजच्या चर्चेत उपमहापौर सखाराम घोडके, निलेश आहेर, बुलंद एकबाल, शान-ए-हिंद, असलम अन्सारी यांनी भाग घेतला....तर मनपातर्फे तुमचा सत्कारपाणीपुरवठा अभियंता यांच्या आडमुठे धोरणामुळे शहराच्या गोरगरीब झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्यांना जलवाहिनीअभावी पिण्याचे पाणी मिळत नाही. तुम्ही निवृत्तीपर्यंत वेळकाढूपणा करीत असाल तर राजीनामा द्यावा. तुमचा मनपातर्फे सत्कार करण्यात येईल, असे खडे बोल महापौर शेख रशीद यांनी जहीर अन्सारी यांना सुनावले.