लातूर : लातूर जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात तसेच पाझर तलावात १४१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, या सर्व प्रकल्पातील पाण्याचे नियोजन टंचाई निवारणासाठी करण्याची हालचाल प्रशासनाने सुरु केली आहे़ मनपाने केलेल्या मागणीनुसार मांजरा नदीवरील बॅरेजेसवरील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे़ शिवाय, बॅरेजेसमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने, निर्माण होणारी तूट भरुन काढण्यासाठी भंडारवाडी प्रकल्पातील शंभर टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला आहे़ लातूर जिल्हा १ नोव्हेंबरपर्यंत मध्यम व लघु अशा सर्व प्रकारच्या प्रकल्पात १४१़३७६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ ८ मध्यम प्रकल्पापैकी तिरु, देवर्जन, साकोळ आणि घरणी या चार मध्यम प्रकल्पांत ३६़३८३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे, तर १२९ लघु प्रकल्पांपैकी कातपूर, सारोळा, एकुर्का, पिंपरी, कल्लूर, नागलगाव, केसकरवाडी, गुरधाळ, निडेबन, डाऊळ-हिप्परगा, कोदळी, वागदरी, कासार-बालकुंदा, बडूर, पानचिंचोली, नागठाणा, मोघा, तेलगाव, कौडगाव, वेलदरी, अंधोरी, काळेगाव, सावरगाव थोट, हंगेवाडी, खरबवाडी, नागझरी, कावलवाडी, बोथी, राचन्नावाडी, आनंदवाडी, संगमवाडी, बामाजीची वाडी, बोखणी, दवणहिप्परगा, अनंतवाडी, बोरुळ, वडमुरुंबी, लासोणा, हळदवाढोणा, घोणसी, हावरगा, डोंगरगाव, रावणकोळा आदी ४६ लघु प्रकल्पांत ४६़३८३ दलघमी पाणीसाठा आहे़ साई, टाकळगाव, वांगदरी, तगरखेडा या चार बॅरेजेसमध्ये ४०़६१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ या सर्व प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी निर्देश दिले आहेत़ दरम्यान, भंडारवाडी व साकोळ प्रकल्पातील पाणी शंभर टक्के पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
अन्नपुण्य केंद्राकडून गरजूंना मदत
By admin | Published: November 04, 2014 12:48 AM