नाशिक : विविध समाज घटकांतील बालकांची काळजी घेत त्यांचा सांभाळ करणाºया अनेक स्वयंसेवी तसेच शासकीय संस्था राज्यात कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्था या दानशूरांच्या मदतीवर अवलंबून असतात. कोरोनाच्या काळात त्यांना मिळणाºया मदतीचा ओघ कमी झाल्याने अशा संस्थांना शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे.महिला व बालकल्याण विभागामार्फत अनेक संस्था स्थापन झाल्या असून, बालकांसाठी या संस्था कार्यरत आहेत. विविध समाज घटकांतील बालके अशा संस्थांमध्ये सध्या आश्रयाला आहेत. कोरोना विषाणूमुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने अशा संस्थांना दानशूरांची मदत होऊ शकलेली नाही. वस्तू आणि पैशांच्या स्वरूपात तसेच अन्नधान्य पुरविणाºया दानशूरांना अडचण निर्माण झाल्याने अशा संस्था अडचणीत सापडल्या आहेत. विशेषत: कोरोनाच्या काळात तर संस्थेमधील बालकांना सॅनिटायझर, साबण, मास्क, वैद्यकीय उपचार आणि अतितातडीच्या गरजांसाठी आर्थिक निधीची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन शासनाने बालकांसाठी काम करणाºया संस्थांना निधीची उपलब्धता करून दिली आहे.महाराष्ट्र बाल निधी व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार व महिला बालकल्याण आयुक्त यांच्या पत्राच्या आधारे कोरोना विषाणुंमुळे उद््भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थांना अत्यावश्यक गरज म्हणून एकूण १६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ज्या जिल्ह्यातील संस्थेत पाचशेपेक्षा जास्त बालके आहेत अशा जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक लाख १०१ ते ४९९ बालके आहेत अशा संस्थांसाठी प्रत्येकी पन्नास हजार, तर १ ते १०० बालके असणाºया संस्थेला प्रत्येकी २५ हजार रुपये अशी आर्थिक मदत दिली जाणार आहे. हा निधी कोरोनामुळे उद््भवणाºया अन्नधान्य, आजारी बालकांसाठी विशेष पोषण अॅम्बुलन्स सेवा, औषधे, वैद्यकीय चाचण्या सॅनिटायझर, साबण आदी अतितत्काळ बाबींसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी यांच्या बँक खात्यावर हा निधी जमा होणार असून, मिळालेल्या निधीचा खर्च योग्य कामासाठी कसा होईल यांचे आवाहन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.--------बालकांच्या संस्थांना दिलासानाशिक शहरात बालकांसाठी काम करणाºया अनेक संस्था आहेत. या संस्थांना कोरोनाच्या काळात आर्थिक मदत केली जाणार आहे. संबंधित संस्थेच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्य विषयक कामासाठी संस्थांना सदर निधी वापरता येणार आहे. सध्या अडचणीच्या काळातून जाणाºया संस्थांना अशा प्रकारच्या निधीची मोठी मदत होणार आहे
बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मिळणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:16 PM