नाशिक : कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार समोर येत आहे. पोलिसांनी पालघरच्या एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात छापा टाकत मुख्य सूत्रधारास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून १ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या ६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सिद्धेश अरुण पाटील असे अटक केलेल्या म्होरक्याचे नाव आहे. आडगाव शिवारात रेमडेसिवर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करताना तीन नर्ससह मेडिकलमध्ये काम करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली होती.पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला गती देत संशयितांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीवरून पोलिसांनी रविवारी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून २० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. तसेच या रेमडेसिविर काळाबाजाराचे धागेदोरे थेट पालघर जिल्ह्यात पोहचल्याचे तपासात पुढे आल्यानंतर आडगाव पोलिसांचे एक पथक पालघरला रवाना झाले. येथील एका कंपनीत संशयित सिद्धेश अरुण पाटील हा हेल्पर म्हणून काम करतो आणि त्याच्याकडून इंजेक्शनच्या बाटल्यांचा कंपनीच्या बाहेर काळ्याबाजारात पुरवठा होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक राजेंद्र कपले, हवालदार सुरेश नरवडे, भास्कर वाढवणे, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, सचिन बाहिकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे, देवानंद मोरे आदींच्या पथकाने कंपनीच्या परिसरात सापळा रचला. संशयित सिद्धेश यास शिताफीने पथकाने बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने नाशिकला इंजेक्शन दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६३ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. आतापर्यंत या टोळीकडून पोलिसांनी सुमारे ८५ रेमडेसिविरच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. त्यातील ६३ बाटल्यांना लेबल नसल्याने यात लेबल तयार करून देणाऱ्या दुसऱ्या संशयिताचाही सहभाग असण्याची श्यक्यता आहे. यामुळे या गुन्ह्यात आणखी संशयित निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.राजकीय वरदहस्त अन् कंपनीभोवती संशयाचे ढगपोलिसांनी पालघर जिल्ह्यात औषध बनविणाऱ्या कंपनीतून मुख्य संशयित सिद्धेश पाटीलला बेड्या ठोकल्या आहेत. सदर कंपनी एका माजी मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या नातेवाइकाची असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी गुजरातमध्ये कोरोना रुग्णांना वाटप केलेले रेमडेसिविर याच कंपनीमधून तर उपलब्ध करून घेतले नव्हते ना? याचा शोध पोलीस घेणार आहेत तर या कंपनीला औषध तयार करण्याचा ठेका दुसऱ्या एका कंपनीने दिला असल्याने या कंपनीतून किती रेमडेसिविर तयार झाले आणि ते कुठेकुठे पाठविले याची नोंदणी आहे, का याचा तपास लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
बाटल्यांवर डल्लाn सिद्धेश औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात हेल्पर असल्याने कंपनीत तयार रेमडेसिविरच्या लेबल नसलेल्या बाटल्या चोरी करून नंतर अभिषेकला पुरवित होता. शेलार दलालीच्या माध्यमातून काळ्याबाजारात हे इंजेक्शन विक्री करत होता.श्रीमंत होण्याचा ‘शॉर्टकट’ घेऊन गेला तुरुंगातn सिद्धेश पाटील हा म्होरक्या असल्याचे उघड झाले आहे. त्याने नाशिकसह अन्य शहरांमध्येही रेमडेसिविरचा पुरवठा केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी पालघरहून अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हा त्याच कंपनीत काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती. त्यातूनच दोघांनी काळाबाजार करत कमी वेळेत अधिक श्रीमंत होण्याचा ‘शॉर्टकट’ निवडला. मात्र, हा शॉर्टकट त्यांना कारागृहात घेऊन गेला.