नाशिक : कोल्हापूर आणि सांगली शहर व परिसरातील पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरूच असून ठिकठिकाणी मदतफेऱ्यांचे आयोजन करण्यात येऊन जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले जात आहे. याशिवाय, काही सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवकही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत.सिध्दी इंटरनॅशनल अकॅडमीसटाणा : येथील बागलाण रोटरी क्लब संचलित इंटरॅक्ट क्लब आॅफ सिद्धी इंटरनॅशनल अॅकडमीच्यावतीने तालुक्यातीत विविध गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. स्कूलच्या १७ बसेसने इंटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी पक्षा भामरे व कृतांत कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांना भेटी देऊन नागरीकांकडुन पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली. यासाठी संस्थापक सरचिटणीस डॉ. प्रसाद सोनवणे, व्यवस्थापकीय संचालक अमर रोहोमारे, प्राचार्य दीपक आव्हाड आदींचे सहकार्य लाभले. आमदार राहुल आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना वस्तू रु पात मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद मिळून देवळा येथून दहा टन जीवनावश्यक वस्तू व साहित्य घेऊन पहिला ट्रक रवाना करण्यात आला. आमदार राहुल आहेर मित्र मंडळ, स्पोर्ट क्लब, शिव निश्चल सेवाभावी संस्था, केदा नाना मित्र मंडळ, नानू आहेर मित्र मंडळ, मृत्युंजय प्रतिष्ठान व रु द्र युवा प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातून संसारोपयोगी साहित्य, औषधे, किराणा सामान, पाण्याचे बॉटल, अशी वस्तू स्वरूपातील मदत जमा केली होती. जमा करण्यात आलेल्या जीवनावश्यक दहा टन वस्तूंचा पहिला ट्रक आमदार आहेर व केदा आहेर यांच्या हस्ते रवाना करण्यात आला. ग्रामसेवक संघटना सरसावलीदेवळा पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक संघटना यांच्यावतीने एका कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतके किराणा सामान, पीठ, तवा, पातेले, पळी, चमच्या, ताट, असे एकूण शंभर पिशव्यांची मदत गटविकास अधिकारी महेश पाटील, ग्रामसेवक युनियनने अध्यक्ष योगेश पगार व सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते आमदार अहेर व केदा अहेर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातून पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 4:01 PM
फेऱ्यांचे आयोजन : जीवनावश्यक वस्तूंचा साठा रवाना
ठळक मुद्देदेवळा येथून दहा टन जीवनावश्यक वस्तू व साहित्य घेऊन पहिला ट्रक रवाना करण्यात आला.