मानोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या सेसमधून येवला तालुक्यात नैसर्गिक आपत्ती योजनेतून येवला तालुक्यातील १५ शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची मदत पंचायत समितीकडून करण्यात आल्याची माहिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिली.दरवर्षी अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सदर मदतीचा हात देण्यात आला. वित्त विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नैसर्गिक आपत्तीची रक्कम आर.टी.जी.एस. द्वारे वर्ग करण्यात आली आहे. तालुक्यातील अशी जळीत, नैसर्गिक आपत्तीची घटना घडली असल्यास तत्काळ पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावा. त्यामध्ये पंचनामा, शेतकऱ्याचे आधारकार्ड व बँक पुस्तक येवला पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे जमा केल्यास त्यांना तत्काळ मदत करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी कृषी अधिकारी यु.बी. सूर्यवंशी , पी. आर.अहिरे , देवीदास गुडघे पाटील आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमाखरवंडी येथील राघुजी शंकर दाणे ,धर्म बहिरु दाणे ,बाबासाहेब चांगदेव आहेर , बोकटे येथील भरत धन्नालाल काळे ,अंबादास नरसिंगराव देशमुख ,अंदरसुल येथील कारभारी महादू धनवटे , नगरसुल येथील अरुण जगन्नाथ जाधव ,अंगुलगाव येथील धोंडिराम बंडू काळे ,अरुण माधव कोकाटे , साताळी येथील भगवान तुकाराम पुंड ,बाभूळगाव येथील कमलबाई बाबासाहेब खडके , बबन देवराम कमोदकर ,संतोष रामकृष्ण भाबड या शेतकऱ्यांना अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्ती योजनेतून १५ शेतकऱ्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 6:47 PM
मानोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या सेसमधून येवला तालुक्यात नैसर्गिक आपत्ती योजनेतून येवला तालुक्यातील १५ शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची मदत पंचायत समितीकडून करण्यात आल्याची माहिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिली.
ठळक मुद्देयेवला तालुक्यातील लाभार्थ्यांचा समावेश