लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी कन्या तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील आंदोलकांचा आवाज बनलेली आकांक्षा पवार हिने दहावीच्या परीक्षेत ८५ गुण मिळवत घेतलेल्या भरारीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी या नेत्यांसह काही उद्योजकांनीदेखील फोन करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासह आकांक्षा व आधारतीर्थ आश्रमला मदतीचा शब्द दिला.आकांक्षा हिने शालेयस्तरावरील वक्तृत्व स्पर्धांमध्येदेखील अनेक बक्षिसे मिळविली आहेत. दहावीच्या परीक्षेत तिने दाखविलेली चमक बघून समाजातील विविध घटकांसह राज्यस्तरीय नेतृत्वानेदेखील आकांक्षाला फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच आधारतीर्थ आश्रमचे संस्थापक त्र्यंबकराव गायकवाड यांच्याशी संवाद साधून नाशिक दौºयावर आल्यानंतर या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींचा सत्कार करण्यासाठी आश्रमाला भेट देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. नोकरीसह मदतीची तयारीऔरंगाबादच्या एका उद्योजकाने गायकवाड यांना फोन करून मीदेखील एका शेतकºयाचा मुलगा असल्याने तुमच्या कार्याचे मोल मला खूप वाटते. त्यामुळे आधारतीर्थला मोठ्या झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीची गरज पडली तर त्यांना अग्रक्रमाने नोकरी देण्याची तयारीदेखील उद्योजकाने दाखविली असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. मला ८५ टक्के मिळतील किंवा शाळेत दुसरी येईन असे वाटले नव्हते. मला अजून खूप शिकायचे असून, डॉक्टर बनून गोरगरीब आणि सामान्य शेतकऱ्यांची सेवा करायची आहे.- आकांक्षा पवार, विद्यार्थिनी
आकांक्षासह आश्रमास मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:57 PM
नाशिक : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी कन्या तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील आंदोलकांचा आवाज बनलेली आकांक्षा पवार हिने दहावीच्या परीक्षेत ८५ गुण मिळवत घेतलेल्या भरारीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी या नेत्यांसह काही उद्योजकांनीदेखील फोन करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासह आकांक्षा व आधारतीर्थ आश्रमला मदतीचा शब्द दिला.
ठळक मुद्देदहावीत यश : आदित्य ठाकरे, बच्चू कडू , राजू शेट्टी यांनी दिला शब्द