गोंदे दुमाला येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरातील अनेक व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये प्रामुख्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या प्रमुख व्यक्ती कोरोनाने हिरावून घेतल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट काळात गोंदे दुमालाचे सामाजिक कार्यकर्ते रूपेश नाठे यांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत या कुटुंबांना जवळपास दीड महिना पुरेल इतक्या अत्यावश्यक वस्तूंसह किराणा वाटप केला आहे. त्यामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या या कुटुंबांना आधार मिळाला असून, या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. दरम्यान, किराणा वाटपप्रसंगी शिवव्याख्याते विनोद नाठे, हृषीकेश मुधले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
इन्फो
वर्षभर विविध उपक्रम
मागील वर्षी कोरोना आल्यापासून ते आत्तापर्यंत अनेक गरजवंत मुलांना शालेय साहित्याचे वाटप करणे, गोरगरीब कष्टकरी आदिवासी नागरिकांना मदत करणे आदी उपक्रम त्यांनी राबविले असून, आजही कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना मदत करण्याचे कार्य सुरूच आहे.
२१ गोंदे दुमाला
गोंदे दुमाला येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या परिवारास किराणा वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते रूपेश नाठे.
===Photopath===
210521\21nsk_9_21052021_13.jpg
===Caption===
२१ गोंदे दुमालागोंदे दुमाला येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या परिवारास किराणा वाटप करतांना सामाजिक कार्यकर्ते रूपेश नाठे.