कळवण आदिवासी विकास प्रकल्पातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, कर्मचारी यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पधिकारी विकास मीना यांनी हा धनादेश सुपुर्द केला. या निधीतून कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड तालुक्यातील कोविड सेंटरला जम्बो सिलिंडर, पीपीई किटसह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होणार असल्यामुळे या तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पवार यांनी सदर निधीचा धनादेश कळवणचे तहसीलदार बी.ए. कापसे यांच्याकडे सुपुर्द केला.
त्यातून कळवण तालुक्यातील कोविड संदर्भातील आवश्यक साधनसामग्रीसाठी ३ लाख २५ हजार रुपये, सुरगाणा तालुक्यासाठी ३ लाख ९० हजार रुपये, सटाणा तालुक्यासाठी २ लाख रुपये,देवळा तालुक्यासाठी ८९ हजार रुपये, मालेगाव तालुक्यासाठी ७९ हजार रुपये तर चांदवड तालुक्यासाठी २८ हजार रुपये निधी कोविड आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी देण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी यावेळी केली.
इन्फो
दोन दिवसात निधी संकलन
आमदार पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कळवण प्रकल्पातील बी.एन. देवरे, एस. जे. बावा, एन. एस. मनियार, पी. डी. कापडणीस, बी. एच. कापडणीस या अधिकारी,शिक्षक, अधीक्षक, कर्मचारी यांच्या प्रतिनिधीनी पुढाकार घेऊन कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्याची भूमिका घेतली. अवघ्या दोन दिवसात ११ लाख ११ हजार रुपयांचा निधी संकलित करण्यात आला.
फोटो - ०५कळवण नितीन पवार
आमदार नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द करतांना सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना. समवेत तहसीलदार बी.ए. कापसे, राजेंद्र भामरे, बी. एन. देवरे, एस. जे. बावा, एन. एस. मनियार, पी. डी. कापडणीस, बी. एच. कापडणीस आदी
===Photopath===
050521\05nsk_45_05052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५कळवण पवार आमदार नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करतांना सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना. समवेत तहसीलदार बी ए कापसे, राजेंद्र भामरे, बी एन देवरे, एस जे बावा, एन एस मनीयार,पी डी कापडणीस, बी एच कापडणीस आदी