पेठ : ऐन कोरोनाच्या संकटकाळात पेठ तालुक्यातील गावस्तरावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा जवळपास हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३ मास्क, सॅनिटायझर व फेसशिल्डचे वाटप करून स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
पेठ तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना रचना ट्रस्ट व जेनिक्स इंजिनिअरिंग यांच्या योगदानातून सोशल नेटवर्किंग फोरमने साहित्य उपलब्ध करून दिले. गावस्तरावर घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांचा शोध घेणाऱ्या आशा सेविका, सर्वेक्षणात महत्त्वाची भूमिका असलेल्या अंगणवाडी सेविका, कोरोना संकटातही शहर स्वच्छ करणारे नगरपंचायत सफाई कर्मचारी व रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवाळे. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, प्रशासनाधिकारी चंद्रकांत भोये, माजी उपसभापती महेश टोपले, विस्तार अधिकारी बाळासाहेब चौधरी, भारती कळंबे, धनश्री कुवर, हेमंत भोये, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, जयदीप गायकवाड , तन्मय शिंदे, दिलीप रेहरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोट...
पेठ तालुक्यातील वाडी-वस्त्यांवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात घरोघर जाऊन सर्वेक्षण व जनजागृतीचे काम करणाऱ्या महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने सुरक्षा साहित्य उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
- संदीप भोसले, तहसीलदार, पेठ
फोटो - २१ पेठ १
करंजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साहित्य वाटप करताना तहसीलदार संदीप भोसले, नम्रता जगताप, अरविंद पगारे, विलास कवाळे, सरोज जगताप, डॉ. योगेश मोरे आदी.
===Photopath===
210521\21nsk_4_21052021_13.jpg
===Caption===
करंजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साहित्य वाटप करतांना तहसीलदार संदिप भोसले, नम्रता जगताप, अरविंद पगारे, विलास कवाळे, सरोज जगताप, डॉ. योगेश मोरे आदी.