कोरोनाच्या कालावधीत मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक यांच्या वतीने सामाजिक जबाबदारीतून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याप्रमाणेच मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ संस्थेला भेट देऊन सदर वस्तूंचे वाटप केले. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाना, कर्नाटक, राजस्थान इत्यादी ठिकाणी परराज्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याची व्यवस्था मेटमार्फत करण्यात आली होती. त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिक शहरातील विभागीय क्रीडा संकुलातील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे २०० ऑक्सिजन व १०० सीसीसी असे एकूण ३०० बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, रुग्णसेवा करण्यात येत आहे. सामाजिक जबाबदारीतून मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोरोनाच्या कालावधीत सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. त्याच माध्यमातून त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ येथील अनाथ मुलांना मदतीचा हात दिला आहे. आज संस्थेच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते या संस्थेला दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य व किराणा मालाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे येथील अनाथ मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीबद्दल आधारतीर्थ संस्थेचे संचालक त्र्यंबकराव गायकवाड यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले .
आधारतीर्थच्या अनाथ मुलांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:14 AM