शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

हेमंत गोडसेंवर शिवसेना नाराज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:12 AM

लोकसभा निवडणुकीची तयारी करताना शिवसेनेने नाशिकची जागा ताब्यात ठेवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अन्य पक्षांतील परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यामुळे पक्ष गोडसे यांच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नाराज असल्याचा अर्थ काढला जात असून

नाशिक : लोकसभा निवडणुकीची तयारी करताना शिवसेनेने नाशिकची जागा ताब्यात ठेवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अन्य पक्षांतील परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यामुळे पक्ष गोडसे यांच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नाराज असल्याचा अर्थ काढला जात असून, त्यामुळेच खासदार संजय राऊत यांनी गोडसे यांना डावलून थेट हिरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सेनेचे ‘आवतन’ दिले आहे. हिरे यांनीदेखील शिवसेनेच्या प्रस्तावाला मूक संमती देतानाच खासदारकी व आमदारकी अशा दोन जागांची ‘डिमांड’ ठेवल्यामुळे शिवसेनेबरोबरच राष्टÑवादीतही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.खासदार गोडसे यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्नांचा दिल्लीत पाठपुरावा केला असला तरी, दृष्य स्वरूपात दिसेल असे कोणतेही भरीव काम त्यांच्या कारकिर्दीत उभे राहिलेले नाहीत, शिवाय गेल्या पाच वर्षांपूर्वीच राजकीय परिस्थिती पाहता, सेना-भाजपाने लोकसभेची निवडणूक एकत्र लढविली होती. आता मात्र तशी परिस्थिती दिसत नाही अशा वेळी पक्षाच्या व स्वत:च्या बळावर निवडून येण्याची क्षमता ठेवणाºया उमेदवारांचा शिवसेनेने शोध सुरू केला आहे. त्यातच गोडसे यांचे पक्षातील काही पदाधिकाºयांशी पटत नसल्यामुळे या नाराजीचाही गोडसे यांना फटका बसण्याची शक्यता असून, त्याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी गोडसे यांनी भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाल केल्याची चर्चा पक्ष पातळीवर पसरविण्यात आल्याने पक्ष गोडसे यांच्यावर नाराज असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून एकच उमेदवार दुसºयांदा निवडून येण्याचा विक्रम भल्या भल्यांना आजवर जमला नाही. त्यामुळे गोडसे यांनी कितीही दुसºयांदा लोकसभेसाठी उमेदवारी करण्याची पक्षाकडे इच्छा प्रदशर््िात केली तरी, पक्ष प्रमुखांच्या मनात काही तरी वेगळे चालले असल्याचे खासदार संजय राऊत यांच्या दोन दिवसांपूर्वी हिरे कुटुंबीयांच्या भेटीमुळे निदर्शनास येत आहे.  राऊत यांनी थेट हिरे कुटुंबीयांना शिवसेनेचे आवतन दिले विशेष म्हणजे हिरे कुटुंब राष्ट्रवादीच्या प्रवेशाची तयारी करीत असताना राऊत यांनी सदरचे पाऊल उचलल्याने त्यांच्या या कृत्यास पक्षप्रमुख ठाकरे यांची मान्यता असावी, असा अर्थ शिवसेनेत काढला जात आहे. हिरेंनी राऊत यांना होकार दर्शविला, परंतु त्यासाठी अटी टाकल्या आहेत.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेShiv Senaशिवसेना