नाशिक महापालिकेतील कॉँग्रेस गटनेतापदी हेमलता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:18 PM2019-02-22T15:18:28+5:302019-02-22T15:21:25+5:30

महापालिकेतील कॉग्रेस पक्षाच्या गटनेत्यांसह सर्वच पदाधिकारी बदलावे अशी मागणी मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कॉग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर पक्षाने अधिकृत निर्णय घेतला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी गेल्या बुधवारी (दि.२०) डॉ. हेमलता पाटील यांना पत्र दिले आहे.

Hemlata Patil as Nashik municipal Congress leader | नाशिक महापालिकेतील कॉँग्रेस गटनेतापदी हेमलता पाटील

नाशिक महापालिकेतील कॉँग्रेस गटनेतापदी हेमलता पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देस्मार्ट सिटी कंपनीवरही संचालकपदी होणार नियुक्तीमहापौरांकडून मात्र घोषणेस टाळाटाळ

नाशिक महापालिकेतील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र महासभेत वाचण्यास महापौरांनी टाळले त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिकेतील कॉग्रेस पक्षाच्या गटनेत्यांसह सर्वच पदाधिकारी बदलावे अशी मागणी मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कॉग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर पक्षाने अधिकृत निर्णय घेतला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी गेल्या बुधवारी (दि.२०) डॉ. हेमलता पाटील यांना पत्र दिले आहे.

बुधवारी (दि.२०) महासभेत या बाबत घोषणा होणे अपेक्षीत होते परंतु त्या सभेत गोंधळ झाला होता. त्याच प्रमाणे शुक्रवारी (दि.२०) महासभेत घोषणा होणे अपेक्षीत होते परंतु महापौरांनी अभिनंदनाचे प्रस्तावात देखील तो घेतला नसल्याने कॉँग्रेसच्या गटनेता बदलण्यास भाजपाचा विरोध आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी कॉँग्रेस गटनेता हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे परंतु गोंधळामुळे पत्राचे वाचन करता आले नसल्याचे सांगितले. डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदावर वर्णी लागल्याने नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीवर देखील त्यांची गटनेता म्हणून संचालक नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Web Title: Hemlata Patil as Nashik municipal Congress leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.