साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जागृत ग्रामदैवत श्री बाळनाथ महाराज यात्रेला आजपासून सुरुवात होणार असून, चार दिवस चालणाºया या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म होणार असल्याची माहिती पंचकमिटीने दिली आहे. दरवर्षीप्रमाणे होळीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच अतुल बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र बाळनाथ महाराज यात्रेनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत चार दिवसांचे नियोजन करण्यात आले. तसेच पंधरा पंच म्हणून विठोबा बोरसे, बाजीराव सुलाने, शिवाजी बच्छाव, बालक बोरसे, शरद सोनवणे, नाना बोरसे, राजेंद्र बोरसे, प्रवीण पवार, भारत बोरसे, पांडुरंग बोरसे, अण्णा सुरसे, विजय बोरसे, किरण बोरसे, नाना निकम, आबा बोरसे आदींची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. रविवारी बाजीराव सुलाने व त्यांच्या मातोश्री ग्रामपंचायत सदस्य सावित्रीबाई सुलाने यांनी पालखी तसेच पादुका मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी मंदिराच्या आवारात महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी युवा कीर्तनकार गोपाळमहाराज पाटील जळगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्र म होणार आहे. तसेच दुसºया दिवशी सायंकाळी गावातून मंदिरापर्यंत भव्य अकरा तगतराव बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. १४) भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे.
साकोरा येथे आजपासून यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:11 AM