सटाणा : सटाणा शहरापाठोपाठ आता नामपूर गावासाठीही सुमारे ३० कोटी रु पये खर्चाच्या हरणबारी पाणीपुरवठा या महत्वाकांक्षी योजनेला शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे . यामुळे टंकरग्रस्त नामपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.नामपूर शहराची पंचवीस हजार लोकसंख्या आहे . शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे . त्या तुलनेत पाण्याचे स्त्रोत तुटपुंजे ठरत आहेत. शासनाने भारत निर्माण सारखी योजना राबविली मात्र तीही भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली. पाण्यासारखा पैसा खर्च झाला तरीही नामपूरकर तहानलेलेच राहिले. भर पावसाळ्यातही या गावाला टॅँकरने पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. महिलांना रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . मोसम नदीकाठावर वसलेले शहर असुनही पाण्याचे स्रोत नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू होता. जून २०१८ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा बैठकीत कृती आराखड्याला मंजुरी प्राप्त झाली होती तर नुकत्याच झालेल्या पाणीपुरवठा बैठकीत नामपूरसाठी सुमारे ३० कोटी रु पये खर्चाच्या हरणबारी पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे .या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढून कामाला सुरु वात करण्यात येणार आहे .या योजनेमुळे नामपूरच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा नामपूरच्या हरणबारी पाणीपुरवठा योजनेसाठी वेळोवेळी स्थानिकांकडून मागणी होत होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अंतिम मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी कृती आराखडा मंजूर केला होता. आता अंतिम मंजुरी मिळाल्याने काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.- डॉ.सुभाष भामरे, खासदार
हरणबारी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 6:06 PM
३० कोटींची योजना : नामपूरकरांना मिळणार दिलासा
ठळक मुद्देजून २०१८ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा बैठकीत कृती आराखड्याला मंजुरी प्राप्त झाली होती