नांदगाव : पतंगाच्या मांजाने जखमी झालेल्या बगळ्याला जीवदान मिळाले आहे. बगळा शहरातील अहिल्यादेवी चौकात लिंबाच्या झाडावर १२ तास अडकून पडला होता. लिंबाचे झाड उंच होते. तसेच ज्या फांदीवर बगळा अडकला होता ती बारीक होती. झाडावर चढून बगळ्याला अजून इजा होऊ न देता व चढणारा ही सुखरूप खाली येणे हे मोठे आव्हान होते. कृष्णा त्रिभुवन यांनी ते आव्हान स्वीकारले. झाडावर चढून त्या बगळ्याला खाली घेतले. त्याच्या पंखाभोवती गुंडाळलेला मांजा डॉक्टर नागपाल यांच्या दवाखान्यात आणून काढण्यात आला. डॉक्टरांनी जखमेवर इलाज करून ग्लुकोज व पाणी देण्यात आले. सर्पमित्र दीपक घोडेराव यांनी बगळा वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. नंतर त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. पप्पू शेख, निलेश कांचन, डॉक्टर नागपाल, कुमावत टेलर, नासिर शेख आदींनी परिश्रम केले.
पतंगाच्या मांजाने बगळा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 1:50 PM