शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

भुजबळ खटल्याच्या  सुनावणीत हिरेंची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:01 AM

पंधरा दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक मालेगाव बाह्य (दाभाडी) मतदारसंघात सर्वत्र झळकल्यानंतर होणाºया चर्चेची धूळ खाली बसत नाही तोच, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान माजी आमदार प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे व भाजपावासीय माजी आमदार संजय पवार यांनी दिवसभर न्यायालयात लावलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक मालेगाव बाह्य (दाभाडी) मतदारसंघात सर्वत्र झळकल्यानंतर होणाºया चर्चेची धूळ खाली बसत नाही तोच, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान माजी आमदार प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे व भाजपावासीय माजी आमदार संजय पवार यांनी दिवसभर न्यायालयात लावलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणाºयांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत.  नांदगाव मतदारसंघातून भुजबळपुत्र आमदार पंकज यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेल्या हिरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या राजकीय मत परिवर्तनाचा ठाव अद्याप कोणाला लागू शकलेला नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी अद्वय  हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर या भेटीचा राजकीय अर्थ निघू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली गेली. मंगळवारी भुजबळ यांच्या जामीन अर्जावर दिवसभर युक्तिवाद पूर्ण झाला.  आता सरकार ८ नोव्हेंबर रोजी त्यावर आपले म्हणणे मांडणार आहे.यापूर्वीही भेटन्यायालयीन कामासाठी गेल्यावर भुजबळ यांची भेट झाली असे तोकडे समर्थन संबंधितांकडून करण्यात आले, परंतु कोंबडे कितीही झाकले तरी आरवते, या उक्तीप्रमाणे भुजबळ यांची भेट घेण्यामागचे राजकीय कारण अखेर दडू शकले नाही. ज्यांनी भुजबळ यांची छुपी(?) भेट घेतली त्यांनी नंतर आगामी विधानसभा निवडणूक मालेगाव बाह्य या हिरे खानदानाच्या पारंपरिक मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्यामुळे भेटीमागचा अर्थ स्पष्ट झाला. भुजबळ यांनी गिरणा कारखाना विकत घेतला असून, अद्यापही कारखान्यामुळे त्यांचे या मतदारसंघातील लोकांशी संबंध आहेत, याशिवाय मतदारसंघातील ओबीसी समाज भुजबळ यांच्याशी जोडला गेलेला असल्याने त्यांच्या राजकीय मदतीची गरज भासल्याविना काही गोष्टी शक्य नसल्याचे संबंधित जाणून आहेत. अशा परिस्थितीत भुजबळ यांच्याशी असलेले आजवरचे वैर विसरून जाणे व त्यांच्या न्यायालयीन सुनावणीत जाणीवपूर्वक दिवसभर कोर्ट हॉलमध्ये बसून युक्तिवाद ऐकणे हे कोणत्याही भुजबळ समर्थकाच्या नजरेतून सुटलेले नाही.