शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

नांदगावी नदीपात्रांचा संकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:11 AM

: सन २००९ च्या महापुरात शहरात पाणी घुसून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. या अनुभवाचा अद्यापही प्रशासनाने काहीही धडा ...

: सन २००९ च्या महापुरात शहरात पाणी घुसून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. या अनुभवाचा अद्यापही प्रशासनाने काहीही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. शहरातील दोन्ही नद्यांमध्ये झालेली अतिक्रमणे आणि वनस्पती, गाळ, कचरा यामुळे संकोच झालेले पात्र याचा फटका पावसाळ्यात पुन्हा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शाकांबरी व लेंडी या दोन नद्यांच्या मध्ये शहर वसले आहे. २००९ मध्ये महापूर आल्याने शहरातले काही भाग बुडण्याचा धोकाही त्यातून निर्माण झाला होता. नदीकाठची पक्की बांधकामे व लोखंडी अँगल, पत्रे वापरून उभारलेली दुकाने पुराच्या पाण्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडली व वाहून गेली. त्यानंतर नदीलगतच्या अतिक्रमणांचा धोका यावर खूप चर्चा झाली. नवीन अतिक्रमणे होऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. परंतु २००९ नंतरच्या वर्षात अतिक्रमणे पुन्हा ‘जैसे थे’ झाली.

अतिक्रमणे होऊ न देणे ही प्रशासकीय बाब असली तरी राजकारणाच्या दृष्टीने मते मिळविण्याचा मार्ग म्हणून त्याकडे बघितले जाते. यामुळे तेवढ्यापुरता गाजावाजा होतो. गेल्या तीस वर्षांत मुख्याधिकारी सुधीर राऊत, भदाणे, तहसीलदार सुनील गाढे अशा काही अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली. परंतु, काही वर्षांत ती पूर्ववत झाली. एकीकडे पाऊस नाही. दुसरीकडे नद्या प्रवाहित होत नाहीत. म्हणून त्यांच्या पात्रांना नाल्याचे स्वरूप द्यायचे आणि एखाद्या पावसाने दमदार हजेरी लावली की ओरड करायची. अशा काळात पुराने विस्थापित झाले की, पुनर्वसनासाठी हाकाटी पिटायची, अशी अवस्था सध्या नांदगाव शहराची झाली आहे. पुराने विस्थापित झाल्याच्या तक्रारी एकीकडे तर त्यातून पूर नियंत्रण रेषेच्या नियमावरून होणारी चर्चा असा पाठशिवणीचा खेळ सध्या सुरू आहे.

इन्फो

पात्रांची सुरक्षितता ऐरणीवर

नदीपात्रांमध्येच भर टाकून गिळंकृत होणाऱ्या नदीपात्रांची सुरक्षितता हा ऐरणीवरचा मुद्दा आहे. २००९ च्या पुरात वाहून गेलेल्या अतिक्रमणांच्या जागी सुंदर बाग झाली आहे. त्या बागेच्या रेलिंगवर लावलेले मोठ्ठे होर्डिंग्ज बागेचे सौंदर्य झाकून टाकतात. एका मुख्याधिकाऱ्याने होर्डिंग्ज लावण्यास बंदी केली तर त्याच्यावर राजकीय दबाव आणला गेल्याची बाब सर्वश्रुत आहे.

या अनुषंगाने उपाययोजनांबाबतीत राजकीय पातळीवर मतभिन्नता असताना प्रशासन स्तरावर देखील पाटबंधारे विभाग व महसूल यंत्रणेत समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.

फोटो- १७ नांदगाव रिव्हर

नांदगाव येथे नदीपात्रात सुरू असलेली स्वच्छता मोहीम.

===Photopath===

170621\17nsk_14_17062021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ नांदगाव रिव्हर नांदगाव येथे नदीपात्रात सुरू असलेली स्वच्छता मोहीम.