शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कोरोनाच्या आकडेवारीबाबत राज्य शासनाकडून लपवा छपवी : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 9:33 PM

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत असल्याचा आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

ठळक मुद्देअन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिकशासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभावघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलाभाजपा नेते गिरीश महाजन यांचा सरकारवर आरोप

नाशिक : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत असल्याचा आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने केंद्र शासनाने केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील अनेक मंत्री घराबाहेर पडले नाही. वास्तविक या काळात त्यांचे योगदान मोठे असायला हवे होते, पण तसे झाले नाही. राज्य शासनाने लवकरात लवकर रुग्णांचे स्वॅब घेऊन चाचणी केली असती तर प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली असती, पण प्रशासनाचा समन्वय नसल्याने ते शक्य झाले नाही. पर्यायाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास राज्य शासन अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी अनेक ठिकाणी प्रायव्हेट लॅबला स्वॅब घेऊ दिले जात नाहीत. रुग्णसंख्या वाढलेली दिसू नये यासाठी आकड्यांची लपवा छपवी केली जात आहे. एका अर्थाने राज्य शासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. प्रायव्हेट लॅबलाही स्वॅब घेण्यास परवानगी देऊन चाचणी करू द्यावी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांवर उपचार करावेत. आकडे लपविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. राज्य शासनाकडे यंत्रणा पुरेशी नसल्याने अधिकाºयांच्या बदल्या करूनही शासन आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राज्य सचिव लक्ष्मण सावजी आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.शंभर कोटींची मदत तोकडी कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी केवळ १०० कोटींची मदत ही कमी असून, कोकणासाठी भरीव मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोनाबाबत केंद्राने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असल्याचा दावाही महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे केंद्रातील मोदी सरकारने एक वर्षाच्या कार्यकाळात घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी महाजन यांनी दिली. कलम ३७०, रामजन्मभूमी, नागरिकत्व कायदा यांसारखे ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतले असून, देशातील जनतेने ते शांतपणे स्वीकारले असून, आज देशभरात शांततेचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळेच हे शक्य झाले असल्याचे महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनNarendra Modiनरेंद्र मोदी