इंदिरानगर : परिसरातील पांडवनगरीसह विविध निवासी सोसायट्यांमधील ज्या घरमालकांनी त्यांची घरं भाडेकराराने दिली आहेत. परंतु त्याची माहिती अद्यापही पोलीस ठाण्यात दिलेली नाही. त्यांनी तत्काळ भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात उपलब्ध करून द्यावी अन्यथा अशा घरमालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिला आहे.‘लोकमत’ने सोमवारी (दि.१) ‘पांडवनगरीतील भाडेकरूंविषयी पोलीस अनभिज्ञ’मथळ्याखाली पांडवनगरीतील गुन्हेगारी व या भागातील अनोळखी भाडेकरूंविषयी संभाव्य धोक्याचा इशारा देणारे ‘पोलीस अनभिज्ञ असल्याचे’ वृत्त प्रसिद्ध केले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी तत्काळ या वृत्ताची गंभीर दखल घेत पांडवनगरी परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन अवैधरीत्या राहणाऱ्या भाडेकरूंमुळे उद्भविणाºया गंभीर समस्या आणि संभाव्य धोक्यांविषयी घरमालकांची जागृती केली. तसेच घरमालकांनी त्यांच्या घरात राहणाºया भाडेकरूची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असूनही अद्यापही बहुतेक घरमालकांनी भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात दिलेली नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास अडचण निर्माण होण्याचा धोका असल्याने परिसरात मोहीम राबवून भाडेकरूंची माहिती दडविणाºया घरमालकाविरुद्ध गुुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाºया तोतयापासून सावध राहण्याचे आवाहन करतानाच परिसरात संशयितरीत्या वावरताना कोणीही व्यक्ती आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला.भाडेतत्त्वावर घरेपांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजनेतून सुमारे अडीच हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. परंतु बहुतेक कर्मचाºयांनी त्यांचे घर भाडेतत्त्वावर दिले आहे. शासकीय कर्मचाºयाचा हा एकप्रकारचा व्यवसायच झाला असून, स्वत: आलिशान घरात राहून शासकीय योजनेतील घर भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. यातील बहुतेक घरमालक बाहेरगावी राहत असल्याने त्यांचे घरे भाडे देण्याची व्यवहारही दलाल करीत असल्याने या भागात कोण राहते, कायकरतात याचा सुगावाही पोलिसांना लागत नव्हता. परंतु याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून या भागात नागरिकांची बैठक घेऊन परिसराचा आढावा घेतला.
भाडेकरूंची माहिती लपविल्यास गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 1:18 AM