घोटी : इगतपुरी तालुक्यात रविवारीही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे दुपारी घोटी-वैतरणा रस्त्यावर कोरपगावजवळ एका वळणावर एक महाकाय वृक्ष वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या तारेवर कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. घोटीपासून वैतरणा-त्र्यंबकेश्वर ठिकाणी जाणारा हा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.याबाबत वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असून या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आज दुपारच्या सुमारास घोटी वैतरणा मार्गावर नवीन रस्त्यावर कोरपगावजवळ वळणावर एक महाकाय वृक्ष वादळी वाऱ्यामुळे लगतच्या उच्च दाबाच्या विद्युत तारेवर कोसळला. यामुळे अनेक विजेचे पोलही कोसळले. दरम्यान श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारीे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांचे रस्ता बंद झाल्याने हाल झाले. यामुळे विजेचे खांब या झाडांवर कोसळल्याने या भागातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. (वार्ताहर)
विजेच्या उच्च दाबाचा पोल कोसळला
By admin | Published: August 07, 2016 10:09 PM