सटाणा (जि. नाशिक) : सप्टेंबर अखेर डाळिंबाचे भाव साठी पार करतील असा अंदाज व्यक्त केलेला असतांना बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील पुरुषोत्तम भामरे या शेतकऱ्याचे डाळिंब तब्बल ९५ रु पये प्रतिकिलो दराने विकली गेल्याने डाळींबाने गेल्या तीन वर्षांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या भावाचा आलेख सतत उंचावत असून सटाणा बाजार समितीत बुधवारी डाळींबाला १६२५ रूपये प्रती क्र ेटचा सर्वोच्च भाव मिळाल्याचे जय जनार्दन फ्रुट कंपनीचे संचालक बिंदू शर्मा यांनी सांगितले.सप्टेंबर महिन्याच्या सुरु वातीला डाळींब सरासरी ३० रु पये प्रतिकिलो विकले जात होते. पंधरा दिवसांपूर्वी किलोमागे अचानक वीस रु पयांची वाढ झाली असताना सप्टेंबर अखेर डाळिंबाचे भाव वाढतील असा अंदाज देखील वर्त िवण्यात आला होता. ३ आॅक्टोबर रोजी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील शेतकºयाच्या डाळिंबाला ९५ रु पयांचा प्रतिकिलो दर मिळाला असून गेल्या तीन वर्षातला डाळिंबाला मिळालेला हा उच्चांकी दर आहे.आगामी काळात डाळिंबाचे दर चढेच राहण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. आवक घटल्याने व बिहार, पश्चिम बंगालमध्ये अचानक मागणी वाढल्याने ही अनपेक्षित भाववाढ झाल्याचे सटाणा येथील डाळिंब व्यापाºयांचे म्हणणे आहे.
डाळिंबाला उच्चांकी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 6:25 PM
सप्टेंबर अखेर डाळिंबाचे भाव साठी पार करतील असा अंदाज व्यक्त केलेला असतांना बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील पुरुषोत्तम भामरे या शेतकऱ्याचे डाळिंब तब्बल ९५ रु पये प्रतिकिलो दराने विकली गेल्याने डाळींबाने गेल्या तीन वर्षांचा नवा उच्चांक गाठला आहे.
ठळक मुद्दे९५ रूपये किलो : बागलाण तालुक्यात शिवार खरेदी