कोरोना टाळेबंदीनंतर २०२० वर्षातील ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी वाहन विक्री
१,७६० दुचाकींची विक्री
९७२ चारचाकींची विक्री
---
१९ मार्च जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २३ नोव्हेंबर २०२० पासून शाळा सुरू झाल्या; मात्र नाशिकमध्ये शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
४ जानेवारी २०२१ - नववी ते बारावीचे वर्ग सुरू
२७ जानेवारी २०२१- पाचवी ते आठवीच वर्ग सुरू
१५ फेब्रुवारी २०२१ - ५० टक्के उपस्थितीत जिल्ह्यातील १५९ महाविद्यालये सुरू
१ ऑगस्ट २०२० जात पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन
१० मार्च नाशिक व मालेगाव महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली.
१० मार्च दहावी व बारावीचे वर्ग विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संमतीने सुरू ठेवण्याची परवानगी
-----
विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच देऊन परीक्षा
-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठने कोविड-१९ च्या गंभीर परिस्थितीत आरोग्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना कोविड सुरक्षा कवच योजना सुरू केली. संकटाच्या कोविड-१९ परिस्थितीत परीक्षा घेऊन विक्रमी वेळेत निकालही जाहीर केले.
-आरोग्य विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये कोविड १९ वर दर्जेदार संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठातपर्फे विशेष संशोधन अनुदान उपलब्ध करण्यात आले. कोरोना निवारणासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आले.
-आरोग्य विज्ञान विद्यापीठ आवारात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्यात आली.
-आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले, तसेच विद्यापीठ इमारतीच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या कामाचे ३ नोव्हेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
----
मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा यशस्वी
कोरोनाच्या संकटात राज्यभरातील विद्यापीठांसमोर ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आव्हान निर्माण झाले असताना नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विविध शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन परीक्षांचे यशस्वी आयोजन केले. या परीक्षेत विद्यापीठातील ६ लाख २५ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच टप्प्यात परीक्षा दिली. तर काही कारणाने गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ४ ते ९ नोव्हेंबरदरम्यान दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली.
---------------------