लासलगाव/चाळीसगाव : दिवाळीनंतर कांदा बाजारात पुन्हा तेजी आली असून मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला क्विंटलला कमाल ३,५२० तर नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बाजार समितीत साडेतीन हजार आणि लासलगावला ३२०० रुपये भाव मिळाला. हंगामातील हे सर्वोच्च भाव आहेत.कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले. कर्नाटकातील नवीन कांदा खराब झाला. लासलगावला उन्हाळ कांद्याला १६ आॅक्टोबरला कमाल २,५५१ रुपये तर लाल कांद्याला कमाल १,६४१ रुपये भाव होता.चाळीसगाव बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, वेहेळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पिशोर आणि पाचोरा, भडगाव येथून कांदा विक्रीसाठी येत आहे.कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत़ आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर व्यापाºयांमध्ये कमालीची अस्वस्थता होती़ केंद्र सरकारनेही या प्रकरणात विशेष लक्ष दिले होते़या प्रकरणामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल की नाही याबाबत शेतकरी चिंतित होते़ मात्र मंगळवारी चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदित आहेत़>दिखाऊ दरव्यापारी केवळ एक-दोन वाहनांतील कांदा वाढीव दराने पुकारतात. त्यामुळे ही भाववाढ दिखाऊ आहे.
कांद्याला सर्वोच्च भाव, साडेतीन हजार रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 5:07 AM