नाशिक : क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात उमेदवारी कोण करणार यापासून सुरू झालेली काटे की टक्कर मतदानापर्यंत कायम राहिली आणि मतांच्या टक्केवारीत अनेकांनी आश्चर्यकरीत्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. यामध्ये ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य दिंडोरीतून राष्टवादीचे नरहरी झिरवाळ यांनी मिळविले, तर जिल्ह्यात सर्वांत कमी मतांनी माणिकराव कोकाटे निवडून आले. त्यांना २०७२ इतके मताधिक्य मिळाले.विधानसभा निवडणुकीत गुरुवारी (दि.२४) जाहीर झालेल्या निकालात अनेक धक्कादायक निकाल समोर आले, तर काही मतदारसंघामधील चुरशीच्या लढतीचे जिल्'ाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले होते. राजकीय पक्षांमध्ये झालेली मेगा भरती आणि राजीनामा सत्रामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि अनिश्चितता निर्माण झालेली होती. त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अशा वातावरणात झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांनी राजकीय समीकरणे बदलली तर राजकीय पक्षांचे वर्चस्वही समोर आले.दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांनी ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळविले त्यांनी भास्कर गावित यांचा पराभव केला. सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यंदा हे सर्वांत कमी २०७२ मतांनी विजयी झाले. नांदगावमधील लढतही लक्षवेधी ठरली. विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांना शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी १३ हजार ८८९ मताधिक्याने पराभूत केले. निफाडच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. विद्यमान आमदार अनिल कदम यांचा राष्टÑवादीच्या दिलीप बनकर यांनी १७ हजार ६६८ इतक्या मताधिक्याने पराभव केला. कळवणच्या लढतीत नितीन पवार यांनी आमदार जे. पी. गावित यांना पराभूत करताना ६५९६ मतांची आघाडी घेत विजय मिळविला.चांदवडमधून राहुल आहेर यांनी शिरीष कोतवाल यांच्यावर २६,३४० मताधिक्य मिळविले. यंदा मताधिक्य वाढले आहे. येवल्यात राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात दुसºया क्रमांकाचे मताधिक्य मिळविले. नाशिक पश्चिम पूर्वमधून राहुल ढिकले यांनी आमदार सानप यांचा दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे यांनी २८ हजारांच्या फरकाने विजय मिळविला. नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांनी ९६२२ मताधिक्य मिळविले, तर इगतपुरीतून हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांंचा ३१,५५५ इतक्या मताधिक्याने पराभव केला. २०१४ मध्ये गावित यांनी १० हजारांचे मताधिक्य घेतले होते.मालेगावी चुरशीच्या लढतीमालेगावचे एमआयएमचे उमेदवार मोहमंद इस्माईल अब्दुल खालीक यांनी ३८,५१९ मताधिक्याने कॉँग्रेसच्या आसिफ शेख यांचा पराभव केला. मालेगाव बाह्यमधून दादा भुसे यांनी कॉँग्रेसच्या तुषार शेवाळे यांच्यावर ४७,६८४ मताधिक्य मिळविले आहे. बागलाणमधूनही आमदार दीपिका चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. भाजपच्या दिलीप बोरसे यांनी ३३,६९४ मताधिक्याने चव्हाण यांना मात दिली. २०१४ मध्ये ४१८१ मताधिक्य चव्हाण यांना मिळाले होते.
नरहरी झिरवाळ यांचे सर्वाधिक मताधिक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 1:16 AM