शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

मराठा आंदोलनाने हायवे जाम

By admin | Published: February 01, 2017 1:17 AM

चक्का जाम : शहराच्या विविध भागांत काहीकाळ वाहतूक विस्कळीत

नाशिक : सकल मराठा समाजातर्फे सरकारकडे केलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आडगावनाका येथे मुंबई-आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून वाहतूक अडविली. त्याचप्रमाणे नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा, सातपूर परिसरात नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग, सिडकोमध्ये त्रिमूर्ती चौक, विल्होळी आदि ठिकाणी आंदोलन केले. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाज संघटित होऊन रस्त्यावर उतरला असून, राज्यभरात शांतापूर्ण मार्गाने मराठा क्रांती मूक मोर्चे काढल्यानंतर या समाजाने मंगळवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याचाच भाग म्हणून आडगाव नाका येथे मुंबई - आग्रा महामार्गावर मराठा समाजाने रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून चक्का जाम आंदोलन केले. आंदोलकांमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबरच युवक, युवती, महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. वारकरी सांप्रदायातील मराठा समाजाच्या ज्येष्ठ मंडळींनी टाळमृदुंगाच्या तालात भजन करीत रस्ता अडविला, तर तरुणाईने ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा‘ अशा घोषणा दिल्या. यावेळी कोपर्डी हत्त्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या करीत घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)