शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

By admin | Published: February 01, 2017 1:48 AM

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

नाशिक : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुंबई - आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने चक्का जाम करण्यात आल्याने मोर्चाप्रमाणेच हे आंदोलन-देखील शांततेत पार पडले. तथापि, यानंतरही अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. नाशिक जिल्ह्यात सटाणा, देवळा, येवला, कळवण, निफाड, मनमाड, चांदवड, मालेगाव, लासलगाव व सिन्नर तालुक्यात नाशिक शहरात आडगाव मार्गावर जत्रा हॉटेल, सिन्नर फाटा, सातपूर, विल्होळी, पेठरोड तसेच सिडकोतील त्रिमूर्ती चौक आदि ठिकाणी आंदोलने करण्यात आली. प्रामुख्याने मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टर आडवा लावून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक, युवती, महिला, पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक शहरात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी टाळ-मृदंगाच्या तालात भजन करीत मुंबईआग्रा महामार्ग अडविला. यावेळी तरुणाईने ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्वच ठिकाणी आंदोलकांनी कोपर्डी हत्त्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, मराठा समाजाला  आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या करीत घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना वारंवार रस्ता खुला करण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलक चक्काजामच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना शांततापूर्ण विरोध करीत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी शीघ्रकृती दलाच्या मदतीने आंदोलकांना रस्त्यावरून हटविण्यासाठी बळाचा वापर सुरू केल्याने आंदोलक संतप्त झाले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडल्याने काही आंदोलकांनी समजदारीची भूमिका घेत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप केला.  नाशिक शहरात व्दारका चौफुली तसेच नाशिकरोड येथील सिन्नरफाटा येथेही रास्ता रोको करण्यात आल्याने मुंबई आग्रा महामार्गाबरोबर नाशिक पुणरोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच सातपूर येथे देखील रास्ता रोको करण्यात आले. आंदोलन शांतते पार पडल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची केवळ नावांची नोंद घेऊन सोडून देण्यात आले तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.  (प्रतिनीधी)